Maharashtra Vidya Mandal

महाराष्ट्र विद्या मंडळ

(Law College Road)

महाराष्ट्र विद्या मंडळ

(66/5, Law College Road, Opp., Law College, Pune – 411004)

परांजपे मराठी प्राथमिक विद्यालय

मुख्याध्यापिकेच्या नजरेतून

विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबत विद्यार्थ्यांचे चांगले चरित्र व आदर्श व्यक्तिमत्त्व घडविणे अत्यंत आवश्यक आहे. आज जगात सर्व बाजूंनी नैतिक मूल्यांचा -हास होत चालला आहे. चोरी, लबाडी, भ्रष्टाचार, व्यभिचार, धार्मिक दंगे यांचे प्रमाण वाढत आहे. या घटना कमी करण्यासाठी नवीन पिढी पुढे नैतिक मूल्यांचे शिक्षण देणे गरजेचे आहे.

आपल्या शाळेमध्ये चांगेल चारित्र्य, आदर्श व्यक्तिमत्व घडविण्याचा कसोशीने प्रयत्न केला जातो. विद्यार्थ्यांना नैतिक मूल्यांचे शिक्षण दिले जाते.

विद्यार्थ्यांची वाचनाची तहान भागविण्यासाठी शाळेमध्ये मोठे ग्रंथालय उपलब्ध करून दिले आहे.

शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना व्यायाम व खेळाचे महत्त्व कळले पाहिजे. व्यायामामुळे व्यक्तीचा शारीरिक व मानसिक विकास होतो. विद्यार्थ्यांसाठी शाळेमध्ये विविध खेळांचे आयोजन केले जाते. अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांना इतर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.शिक्षकांनी माझ्या भावना ह्या कधीतरी समजून घेऊन मोकळेपणाने गप्पा माराव्यात. बिनधास्तपणे बोलावे असे मला वाटते पण मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यामध्ये थोडीशी दरी निर्माण झालेली असते. परंतू एक मुख्याध्यापक म्हणून ही थोडीशी दरी सुद्धा निर्माण होऊ नये ही काळजी घेण्याचा मी प्रयत्न करीत असते. शाळेमधील वातावरण हे आनंददायी व प्रेरणादायी असावे यासाठी शाळेतील शिक्षकांना त्यांच्या कामामध्ये स्वतंत्रता दिली जाते.

शिक्षण विद्यार्थ्यांना निर्णय घेण्याची क्षमता, मानसिक चपळता, समस्या सोडविणे, तार्किक विचार यांसारखी कौशल्ये विकसित करण्यात मदत करते. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा या कौशल्यांचा विकास करण्याच्या दृष्टीकोनातून उपक्रमांची रचना करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्याला आत्मविश्वासपूर्ण व्यक्ती बनवण्यास मदत केली जाते.

अनेक जाती अनेक धर्म अनेक भाषा या सर्वांचा वारसा नैसर्गिकरित्या आपल्याला लाभला आहे. त्यामुळे शाळेमध्ये ‘सर्वधर्मसमभाव’ या मूल्याची शिकवण प्रकर्षाने दिली जाते. जातीचा/धर्माचा विचार न करता विद्यार्थी, शिक्षक यांच्यामधील गुणवत्तेला महत्त्व दिले जाते. गुणवत्तेचा/ बुद्धीमत्तेचा शाळेमध्ये आदर करून प्रत्येकाला समानतेची वागणूक दिली जाते.

शाळेमध्ये व्यक्तिनिष्ठेचा विचार, न करता वस्तूनिष्ठेचा विचार केला जातो. व्यक्तिनिष्ठेचा विचार करून जर कामकाज केले गेले तर शाळेचा विकास न होता शाळेची अधोगती होण्यास सुरुवात होईल.

त्यामुळे जर शाळेला उंच शिखरावर नेऊन तिचा विकास करायचा असेल तर मुख्याध्यापक म्हणून मी वस्तूनिष्ठेचा स्विकार करून शालेय कामकाज करणे उचित असते. त्यामुळे प्रत्येक शिक्षक, विद्यार्थी यांच्याकडे वस्तूनिष्ठेपणे पाहिले जाते.

विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या तिघात एकसूत्रता आणि समानव्यय साधण्याचा प्रयत्न एक मुख्याध्यापक म्हणून केला जात आहे.

आजचे युग संगणकाचे युग आहे. दिवसेंदिवस संगणकाचा वापर वाढत आहे. यापुढेही भविष्यात संगणकाचा वापर वाढणार आहे. म्हणून शाळेत संगणक शिक्षणावर भर दिला जात आहे

एक सशक्त, मजबूत आणि प्रामाणिक भारतीय नागरिक परांजपे मराठी प्राथमिक शाळेमधून बाहेर पडेल.

इतरांच्या स्वप्नातील शाळा ही परांजपे मराठी प्राथमिक विद्यालयाप्रमाणेच असणार हे नक्कीच !!!!!

मुख्याध्यापिका
सौ. सुषमा राकेश भोसले.
(MVM परांजपे मराठी प्राथमिक विद्यालय)
Email: mvmparanjape@gmail.com

परांजपे प्राथमिक मराठी विद्यालय ही मराठी माध्यम व सेमी इंग्रजी माध्यमाची पुण्यातील प्रसिद्ध शाळा. आधुनिकता व पारंपारिकता याची सांगड घालणारी, हीरक महोत्सव साजरा केलेली शाळा. स्पर्धेच्या युगात परीक्षार्थी न बनता ज्ञानार्थी बनवून यशाची शिखरे गाठणारे विद्यार्थी भारताच्या परंपरागत उत्कृष्ट संस्कृतीचे संस्कार घडवून देशभक्त, सुसंस्कारित, परिपूर्ण आदर्श नागरिक घडविण्याचे कार्य शाळेत संपूर्ण निष्ठेने केले जाते प्रशालेतील ठळक वैशिष्ट्ये

शिक्षण प्राप्तीचे अद्ययावत केंद्र

अश्या दर्जेदार प्रशालेत आपला पाल्य शिकावा असे प्रत्येक पालकाला नक्कीच वाटेल. त्याकरिता आम्ही इयत्ता पहिली ते चौथी करिता प्रवेश देणे सुरु केले आहे. त्वरित आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा.

फोटो गॅलरी

videos